देणगी

सहभागी व्हा |
सांगली शहर हे गणपतीच्या कृपाशिर्वादाने पावन आहे. या नगरात दोन वैद्यकीय महाविद्यालये, तीन  अभियांत्रिकी महाविद्यालये, पाच तंत्रनिकेतने, दोन दंत महाविद्यालये तसेच अनेक संगणक, शिक्षणशास्त्र, व्यवसाय प्रशासन तज्ञ अभ्यासक्रम राबविणाऱ्या संस्था आहेत. त्यात शिक्षण घेण्यासाठी अनेक गरीब व हुशार विद्यार्थी दूरवरून येत असतात. येथील रहाण्याचा, जेवणाचा खर्च परवडत नाही त्यामुळे बऱ्याचदा त्यांना शिक्षण अर्धवट सोडून जावे लागते. त्यांची वेळप्रसंगी मोफत वा अल्प दरात उपरोक्त सोय व्हावी या उद्देशाने मंडळाने सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्राच्या मध्यवर्ती ठिकाणी ६१३१ स्क़ेअर फुटाची बिगर शेती प्लॉट जागा खरेदी घेतली आहे. त्याजागेवर छोटेसे उद्योजकता विकास केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ग्रंथालय या सारखे उपक्रम राबविण्याकरता सभागृह, विद्यार्थ्याना व विद्यार्थीनींना राहणेकरिता वसतिगृह व समाजासाठी वेदमूर्ती भगवान जिव्हेश्वर मंदिर उभारण्याचा संकल्प मंडळाने केला आहे. नियोजित जिव्हेश्वर भवनाचा आराखडा मुख्य पानावर दिलेला आहे.  सदर उपक्रमासाठी बराच निधी लागणार आहे. त्यासाठी आपल्या अनेक प्रकारे सहकार्याची गरज आहे. आम्ही खालील योजना राबविण्याचे ठरविले आहे –

देणगी –
हितचिंतक सभासद – देणगी मूल्य रुपये फक्त १०००/-
आश्रयदाते सभासद – देणगी मूल्य रुपये फक्त ३०००/-

तसेच आपण सभागृह, मंदिर, वसतीगृहातील एक व अनेक खोल्यासाठी प्रायोजक बनू शकता. आपली देणगी वस्तुस्वरुपात देखील स्विकारली जाईल. देणगी देणाऱ्याचे नावास कायमस्वरूपी योग्य त्या ठिकाणी प्रसिद्धी दिली जाईल. त्यासाठी मंडळाशी कृपया संपर्क साधावा हि नम्र विनंती.

आपली छोटीसी देणगीदेखील आम्हांस लाख मोलाची ठरणार आहे. आपण दिलेल्या देणगीचा योग्य विनियोग होईल असे आम्ही आपणास अभिवचन देत आहोत.

 

कृपया देणगी खालील बँकेत जमा करावी:

नाव:  स्वकुळसाळी समाज सेवा मंडळ, सांगली

खाते क्रमांक:   017001100000051

बँकेचे नाव: कल्लापान्ना आवाडे जनता सहकारी बँक लिमिटेड, इचलकरंजी.

शाखा : मार्केट यार्ड, सांगली

IFSC Code :  KAIJ0000017