Vedmurty Bhagwan Jivheshwar Janmostav 2017

प्रिय स्वकुळसाळी समाज बंधू भगिनींनो,

          आपले समाजाचे आद्य दैवत वेदमूर्ती भगवान श्री जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव स्वकुळसाळी  समाजसेवा मंडळ, सांगली श्रावण शुद्ध त्रयोदशी म्हणजेच दिनांक ५ ऑगस्ट २०१७ रोजी असून प्रतिवर्षाप्रमाणे तो मंडळाचे विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे. सन्माननीय श्रीमती शांताताई किसनराव कनोजे, सदस्य शिक्षण समिती, ज़िल्हा परिषद, सांगली व सन्माननीय श्री सागर गवते, उप विभागीय वन अधिकारी, सांगली यांनी या निमित्त होणाऱ्या सभेस मार्गदर्शन करण्यास मान्यता दिली आहे.

         स्वकुळसाळी समाजसेवा मंडळाची प्रतिवर्षाप्रमाणे वार्षिक सर्व साधारण सभा आयोजित केली आहे. त्यास मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य, सभासद व सर्व समाज बंधू भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे हि आग्रहाची विनंती. आपणा सर्वाना या सभेस उपथित राहता यावे म्हणून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व साधारण सभेचे आयोजन दिनांक ५ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६.०० वाजता केले आहे. तरी सर्वानी वेळेवर उपस्थित रहावे ज्यायोगे माधवनगर, बुधगाव, आष्टा येथील समाज बांधवाना कार्यक्रम वेळेत संपल्यामुळे वेळेवर त्यांच्या घरी जाणे सुलभ होईल.

         मंडळाचे घटनेप्रमाणे या वर्षी मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवडणूक आहे. सदरची निवडणूक फेब्रुवारी २०१८ पासून पाच [५ वर्षासाठी] वर्षासाठी आहे. कार्यकारिणीत खालील पदे असतात

  •  अध्यक्ष – १ पद,
  •  उपाध्यक्ष – १ पद,
  • सचिव – १ पद
  • खजिनदार – १ पद
  • सदस्य – एकूण ७ पदे

[यात महिलांसाठी २ पदे राखीव आहेत.]

बिन राखीव पदावर देखील महिलांना निवडणूकीत उभे राहता येते. त्याची अधिसूचना याबरोबरच स्वतंत्रपणे येथे दिली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करण्यास समाज बांधव श्री. प्रशांत सुदाम आमते, मोबाईल व व्हाट्स अप  क्रमांक +९१ ९७ ६४२ ३३८ ८० यांनी मान्य केले आहे. तरी इच्छुक समाज बंधू – भगिनींनी आपले नामांकन पत्र वेळेवर दाखल करावे हि आग्रहाची विनंती.

           समाज बांधवांनी उत्सव वर्गणी जास्तीत जास्त द्यावी दरवर्षी कार्यालय भाडे, महाप्रसाद खर्च व इतर अनुषंगिक खर्च महागाईमुळे वाढत आहेत. याची जाणीव ठेवावी.  जे समाज बांधव जास्तीच्या खर्चाचा भार उचलतात त्यांना विनंती कि, त्यांनी नेहमीप्रमाणे रुपये १००१/- प्रत्येकी उत्सवाचे दिवशी जन्मकाळाचे वेळीच द्यावे, म्हणजे कार्यक्रमाचा खर्च लगेचच भागवणे शक्य होईल. रुपये १००१/- देणाऱ्या सदस्यांमध्ये जास्तीत जास्त सदस्यांनी सहभागी व्हावे हि विनंती.

          बऱ्याचवेळा काही समाज बांधव जिव्हेश्वर जन्मोत्सवाचे दिवशी महाप्रसाद, कार्यालय भाडे, विध्यार्थी बक्षिसे इत्यादि खर्च प्रायोजक म्हणून करत असतात. या वर्षी ज्या समाज बांधवाना हा खर्च प्रायोजक म्हणून करावयाची इच्छा असेल त्यांनी मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिनकर डहाके यांचेशी उपरोक्त पत्त्यावर संपर्क साधावा. हि नम्र विनंती.

          ज्या समाज बांधवांचे घरी विवाह सोहळा, वास्तुशांत, बारसे, डोहाळे जेवण इत्यादी मंगल कार्ये झाली असतील त्यांनी यथाशक्ती मंगल निधी द्यावा. इमारत निधीसाठी दरवर्षी काहींना काही रक्कम द्यावी हि नम्र विनंती.

          समाजातील बालवाडी पासून पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या व त्या त्या वर्गात प्रथम येणाऱ्या विध्यार्थाना उतेजनार्थ रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात येते. कैं. श्री. सदाशिव सोनाप्पा चौधरी यांनी समाजाकडे दिलेल्या देणगीच्या व्याजातून १० वी नंतरचे उच्च्य शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरू विध्यार्थाना शैक्षणिक मदत देण्यात येते. श्री. रामचंद्र बळवंत मानकर यांनी समाजाकडे दिलेल्या देणगीतून दोन विध्यार्थाना रोख बक्षीस देण्यात येते. काही समाज बांधव ऐनवेळी काही बक्षिसे जाहीर करतात या सर्वासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिनकर डहाके, यांचेकडे उपरोक्त पत्त्यावर गुणपत्रिकेच्या प्रतीसह दिनांक १ ऑगस्ट   २०१७ पर्यंत अर्ज करावे. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

          आपले स्वकुळसाळी समाजसेवा मंडळाचा व्हाट्स अप ग्रुप आहे, त्यामुळे एकमेकांशी केव्हाही संपर्क  साधणे सहज शक्य होते, करिता  ज्या समाज बांधवांकडे स्मार्ट फोन आहे, त्यांनी आपला फोन क्रमांक मान. अध्यक्ष यांचेकडे कळवावा, त्यांचे नाव ग्रुपमध्ये समाविष्ट करता येईल. या वर्षांपासून दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी सणाचा एकवेळ फराळ, मकर संक्रांति,समाजाची एक दिवसाची सहल, दरमहा समाज मिटिंग, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आदी कार्यक्रम साजरे करण्याचा मानस आहे. यासाठी कार्यक्रम संयोजक म्हणून, आपले घरी कार्यक्रम आयोजित करायचा म्हणून वा कार्यक्रम संपूर्णतः अथवा अश:ता प्रायोजित करावयाचा म्हणून समाज बांधवानी पुढे यावे असे आवाहन करीत आहोत.

आपले विनीत

  • प्रा. दिनकर डहाके, अध्यक्ष
  • श्री. रामचंद्र मानकर, उपाध्यक्ष
  • श्री. श्रीकांत आमते, सचिव
  • श्री. अवधूत ठोके, खजिनदार

सदस्य –

  • श्री. चंद्रकांत पोटे,
  • श्री. रघुनाथराव बडवे,
  • श्री. हणमंतराव शिंगारे,
  • श्री. नामदेवराव दुधाणे,
  • श्री. प्रशांत भंडारे,
  • सौ. कविता शेळके,
  • सौ. गीता शिंगारे

Comments are closed