स्वकुळसाळी समाजसेवा मंडळ, सांगली
नोंदणी क्रमांक – महाराष्ट्र एफ ३५५०/सांगली
पंचवार्षिक निवडणूक अधिसूचना
दिनांक १ जून २०१७
स्वकुळसाळी समाजसेवा मंडळ, सांगली यांचे घटनेतील तरतुदीनुसार फेब्रुवारी २०१८ पासून पुढील पाच वर्षाकरिता कार्यकारिणीवर काम करणेसाठी पात्र सभासदाकडून नामांकन मागविण्यात येत आहेत. कार्यकारिणीवर खालील पदे आहेत.
- अध्यक्ष – १ पद,
- उपाध्यक्ष – १ पद,
- सचिव – १ पद
- खजिनदार – १ पद
- सदस्य – एकूण ७ पदे
[ यात २ पदे महिलांसाठी राखीव] सर्व साधारण असलेल्या सर्व पदासाठी महिला नामांकन अर्ज दाखल करू शकतात.
निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे –
१. नामांकन पत्र दाखल करणेचा कालावधी – दिनांक १६ जून २०१७ ते ३० जून २०१७
२. नामांकन पत्र छाननी – दिनांक २ जुलै २०१७
३. नामांकन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक – दिनांक ५ जुलै २०१७
४. अंतिम नामांकन जाहीर करण्याचा दिनांक – दिनांक ५ जुलै २०१७
५. आवश्यकता भासल्यास मतदानाचा दिनांक – दिनांक५ ऑगस्ट २०१७
६. निकाल घोषित करण्याचा दिनांक – दिनांक ५ ऑगस्ट २०१७
वरीलप्रमाणे निवडणुकीचा कार्यक्रम आहे. करीत इच्छुक मंडळाच्या पात्र सभासदांनी आपले विहित नमुन्यातील नामांकन अर्ज निम्नस्वाक्षरीकारांकडे दाखल करून पोच घ्यावी. अर्जाचा नमुना खाली दिला आहे. निवडणूक नामांकन पत्र आपण येथे क्लिक करून, प्रिंट करून भरू शकता किंवा मंडळाचे पदाधिकाऱ्याकडे मागू शकता. निवडणूक नामांकन पत्र बिना शुलक आहे.
निवडणूक अधिकारी
श्री. प्रशांत सुदाम आमते,
मोबाईल व व्हाट्स अप क्रमांक +९१ ९७ ६४२ ३३८ ८०